Anita Rugna Sahayya Kendra (Spring of humanity)

Medical equipments like urine pot, bed pan, commode chair upto oxygen concentrator or bipap ventilator are given to the patients for domiciliary management at free of cost, only on refundable deposit basis.

Established : 5th Feb, 2012

Faith & Selfless Service

Providing support and medical assistance to patients and families in need. All Rugna Mitras work voluntarily without receiving any remuneration.

prmo icon

No Daily Rent or Charges

taken against the supply of medical article. Only Transport, Damage, Repairs and oxygen refiling charges are given by the patient.

prmo icon

Nearly 7000 Patients are benefitted

Ensuring essential healthcare resources are available to all sections of society.

Medical Equipments

Bed Pan

causes

Walking Stick

causes

Commode Chair

causes

Walking Stick

causes

Crutches

causes

Back Rest

Knee Brace

causes

Commode Seat

causes

Walker

causes

Air Bed Pump

causes

Mattress

causes

Flowmeter Assembly

Wheel Chair

causes

Nebulizer

causes

Suction Machine

causes

Semi Fowler bed

causes

Railing

causes

Traction Unit

View Catalogue

How it all Started - Our Journey


"आकाश पेलताना"
नीला सत्यनारायण, गुढीपाडवा व न्यास

साधारण ऑक्टोबर २०११ च्या दरम्यान आम्हाला विचारणा झाली, "तुमच्या संस्थेतर्फे डोंबिवलीला नीला सत्यनारायण यांच्या कवितांवर आधारित डॉ. संध्या पुरेचा यांच्या चमूचा नृत्याचा कार्यक्रम करता येईल का?" त्यानुसार आम्ही मंत्रालयात त्यावेळच्या राज्य निवडणूक आयुक्त मा. सौ. नीला सत्यनारायण यांना कार्यालयात भेटून पूर्वतयारीला सुरुवात केली. त्यांनी उत्तरा मोने यांचं नाव कार्यक्रमाच्या निवेदनासाठी म्हणून सुचवलं, तसेच त्या स्वतःही कार्यक्रमाला येणार असे त्यांनी आवर्जून सांगितले. सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे ठिकाण निश्चित करून प्रायोजकही नक्की करण्यात आले. नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास या संस्थेच्या माध्यमातून १९ विविध सांस्कृतिक संस्थांना एकत्र करून, सर्वांसाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध करून, हा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार एक संयुक्त बैठक २८ नोव्हेंबरला झाली, त्यात शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे श्री. मनोहर जोशी यांनी असे उपक्रम संयुक्तपणे निश्चितच यशस्वी होऊ शकतील असे सांगितले.

त्याप्रमाणे श्री विनायक कुलकर्णी यांनी पत्रके, मोफत प्रवेशिका, व्यासपीठ सजावट आकर्षकपणे तयार केले. सर्व संस्थांचे सदस्य व रसिक यांनी प्रवेशिका घेऊन उदंड प्रतिसाद दिला. अशी सर्व तयारी सुरू असतानाच आदल्या दिवशी दिनांक २ डिसेंबर २०११ ला आम्हाला निरोप मिळाला - तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानाहून. आणि ३ डिसेंबर २०११ ला आम्ही सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलो. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सत्वशीलादेवी चव्हाण यांनी, त्यांच्या मातोश्री तंजावूर येथील भोसले घराण्याच्या माँसाहेब लीलाताई राजेभोसले यांच्यासह हा कार्यक्रम बघण्याची इच्छा व्यक्त केली. संध्या पुरेचा यांच्या संस्थेचे नाव "सरफोजी राजे भोसले सेंटर" असल्याने आणि सत्वशीलादेवी यांचे माहेर तंजावूरचे भोसले घराणेच असल्याने या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा मानस असावा. आम्ही त्यांना सहर्ष आमंत्रण दिले. त्याप्रमाणे आवर्जून त्या, त्यांच्या वयोवृद्ध मातोश्रीना व्हीलचेअरवर घेऊन आल्या व त्यांनी संपूर्ण कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला. अशा या दुर्मिळ व अभिनव कार्यक्रमासाठी संपूर्ण नाट्यगृह तुडुंब गर्दीने भरले होते.

डोंबिवलीकरांनी संपूर्ण नृत्याविष्काराला व नीला सत्यनारायण आणि संध्या पुरेचा यांच्या मनोगतांना मनस्वी प्रतिसाद दिला. शीतल तळपदे यांच्या प्रकाश योजनेने व नृत्यांगनांच्या आकर्षक नृत्यशैलीने सर्व रसिकांना मोहित केले. आचार्य पार्वतीकुमार यांच्या शिष्या प्रख्यात नृत्य कलाकार डॉ. संध्या पुरेचा यांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली "आकाश पेलताना" या कार्यक्रमाचे एकंदर १६ प्रयोग विविध ठिकाणी यशस्वीरित्या सादर झाले. डोंबिवलीचे श्री. शं. ना. नवरे तसेच अविनाश व ऐश्वर्या नारकर हे सन्माननीय अतिथी आले होते आणि डोंबिवलीचे मिथिलेश पाटणकर व गौरी कवी मिरजगावकर यांचा "आकाश पेलताना" या सीडीच्या संगीत संयोजन व गायनाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. हा सर्व कार्यक्रम मूर्त स्वरूपात सादर करून यशस्वी झाला याचे संपूर्ण श्रेय तत्कालीन महापालिका आयुक्त श्री. रामनाथ सोनवणे यांचेच आहे.

तसेच या कार्यक्रमाची दुसरी महत्त्वाची आठवण म्हणजे मध्यंतरात न्यासाची माहिती सांगत असताना, आगामी प्रकल्पाबद्दल म्हणजे रुग्ण सहाय्य केंद्र याचे सुतोवाच आम्ही केले होते. माझा फोन नंबर श्री. पुरोहित यांनी लिहून ठेवला व ५ फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांच्या भावाला ऑक्सिजन सिलेंडर देऊन अनिता रुग्ण सहाय्य केंद्राचे बीजारोपण झाले आणि आज ९ वर्षात रुग्णोपयोगी साहित्य घरी वापरण्यासाठी विनाशुल्क देऊन सुमारे ६००० रुग्णांना दिलासा देता आला. अनौपचारिक रित्या या अनिता रुग्ण सहाय्य केंद्राची ५ फेब्रुवारी २०१२ या दिवशी सुरुवात झाली असली तरी त्या वर्षीच्या गुढीपाडव्याला औपचारिक शुभारंभ मा. श्री प्रकाश पाठक यांच्या हस्ते झाला, त्याला आज नऊ वर्ष पूर्ण झालीत, म्हणून ही स्मृती कथा.

- डॉ.सुनील पुणतांबेकर,
अध्यक्ष, नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास, डोंबिवली ९८२०२१०८२४ दि. १३/४/२०२१

Nanasaheb Puntambekar Smriti NYAS, Dombivli

Through collective efforts and community participation, we strive to build a compassionate, healthy, and sustainable society. We sincerely thank all our volunteers, donors, and well-wishers for being partners in this noble mission.

Reach Us

  • npsndombivli@gmail.com
  • 9820 210824
  • 3 & 4, Srushti Sudama CHS, Near CKP Hall, Gadkari Path, Dombivli (E).
    Mon. to Fri. Time 5 to 7 p.m.